पावसाचा अंदाज ; राज्यात विजासह जोरदार पावसाचा इशारा

पावसाचा अंदाज ; राज्यात विजासह जोरदार पावसाचा इशारापावसाचा अंदाज ; उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तुरळक ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. आज विदर्भ. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वायव्य अरबी समुद्रात पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून बरेली, बाराबंकी, देहरी, पुरुलिया, दिघा, ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी पारा तिशीपार आहे. गुरुवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी (ता. १०) सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारी दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने तडाखा दिला. गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंत नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर, तर सोलापूर येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जोरदार पावसाचा इशारा : (येलो अलर्ट)सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.विजांसह पावसाचा इशारा : (येलो अलर्ट)अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा



