राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ! १२ ते १८ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; पंजाबराव डख यांचा जिल्हानिहाय अंदाज

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
राज्यात आजपासून परतीच्या पावसाला (Return Monsoon) सुरुवात, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी पिकांच्या काढणीचे नियोजन करण्याचे आवाहन.
जिल्ह्यांमध्येही १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घ्यावी.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही या परतीच्या पावसाचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे.
विदर्भ: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये आज, १२ सप्टेंबरपासून ते १७ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे.
उत्तर महाराष्ट्र: मुंबई, इगतपुरी, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या पट्ट्यात १४ ते १८ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तळोदा, शिरपूर, यावल, चोपडा, अकोट, तेल्हारा, सावनेर या भागांतही जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांसाठी तातडीचा कृषी सल्ला
या पावसाच्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या काढणीचे नियोजन तातडीने करावे, असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे. सोयाबीन, मूग, उडीद यांसारखी जी पिके काढणीला आली आहेत, ती पावसाची उघडीप मिळताच काढून घ्यावीत. काढणीनंतर पीक एक तास उन्हात वाळवून लगेच सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे, जेणेकरून पावसाने नुकसान होणार नाही. हा परतीचा पाऊस सर्वदूर आणि जोरदार असणार असल्याने शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊनच पुढील कामांची दिशा ठरवावी.



