सोयाबीन पिकाला फळधारणा न लागल्याने शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
खरंतर एका दाण्याची हजार दाणे करण्याची क्षमता ज्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर काही बियाणे कंपन्या उठल्याचे दिसून येत आहे जळगाव जामोद तालुक्यातील मौजे टाकळी पारस्कर, आसलगाव बाजार, खांडवी, व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी फुले किमया( बालाजी )फुले दूर्वा, या सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र त्या सोयाबीनच्या झाडाला शेंगास न लागल्यामुळे अनेक शेतकरी हैराण झालेले आहे. त्यातच आसलगाव येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनचे उभे पीक करपत आहेत. मुळात शेतकरी मोला – महागाईची बियाणे आपल्या शेतामध्ये पेरतो त्यानंतर त्या पिकाला तळहाताच्या फोळा प्रमाणे जपून त्याची प्रचंड अशी मेहनत करून त्यापासून चांगले उत्पन्न काळू व दोन पैसे मिळूवु अशी अपेक्षा करतो मात्र या ठिकाणी बोगस बी बियाणे कंपनीमुळे शेतकऱ्याला मरणाची दार खुली होताना दिसत आहे सदर ही बाब आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 ला काही शेतकऱ्यांनी व युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी एकत्रित येत शेतातील शेंगा न लागलेले सोयाबीनची झाडे घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे धाव घेतली तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब यांना शेतकऱ्यांनी आपल्या भावना सांगितल्या की आम्ही सोयाबीनचे बियाणे कर्ज काढून घेऊन त्याची भरपूर मेहनत करून लहानाची मोठी सुद्धा केली मात्र आज या सोयाबीनच्या झाडांना शेंगास न लागल्याने आम्ही जीवन जगायचे तरी कशे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या विषयात आपण लक्ष घालून संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी कृषी विभागाचे अधिकारी मिळून पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी. अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असा इशारा या वेळेस देण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
✍️



