उत्सवात पारंपारिक वाद्यांचा वापर करत पिढीला चांगला संदेश देऊन उत्सव शांततेत पार पाडा; अप्पर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी.

कायद्याचे उल्लंघन किंवा गैरवर्तन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा
दि.५ सप्टें.
तेल्हारा : स्थानिक साई मंदिर येथील सभागृहात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली असून यावर्षीचे उत्सव शांततेत पार पडावे या करिता अनेकांनी आयोजित कार्यक्रमात आवाहन केले. सविस्तर वृत्त असे की , शहर व ग्रामीण भागात होणारे हिंदु धर्मातील श्री गणेशोत्सव मिरवणुका ईद आदी ऊत्सव आनंदात, शांततेत व कायद्याचे पालन करून साजरे करावेत. कायद्याचे उल्लंघन किंवा गैरवर्तन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील तसेच विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा व नैसर्गिक फुलांचा वापर करून वेळेचे भान राखत भावी पिढीला चांगला संदेश द्यावा असे आवाहन साई मंदिर तेल्हारा येथील शांतता समितीच्या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी केले.हि बैठक बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात च्या सुमारास पार पडली असून या बैठकीस पोलिस उपअधीक्षक तथा आकोट उपविभागीय अधिकारी निखिल पाटील, तेल्हारा पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या हस्ते अप्पर पोलिस अधीक्षक रेड्डी व उपविभागीय अधिकारी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उलेमाले यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सुद्धा तेल्हारातील सर्व गणेशोत्सव मंडळ तसेच विविध धर्मातील नागरिकांना शांततेत उत्सव पार पाडण्याकरिता आवाहन केले. तसेच देवकीनंदन मथारिया सामाजिक कार्यकर्ता यांनी आपली अनेक वर्षापासून ची परंपरा कायम ठेवत नियमित उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता आवाहन केले .तसेच धर्मेश चौधरी, सचिन थाटे, चंद्रकांत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक सागर कापसे यांनी केले.
याप्रसंगी बैठकीला शांतता समितीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख, विविध वृत्त संस्थाचे ,वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी बंधू यांनी आवर्जून उपस्थिती लगावली



