खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा द्वितीय हप्ता कसा मिळाला ! अधिकारी व लाभार्थी यांच्यामध्ये काहीतरी आर्थिक हितसंबंध असल्याचे चर्चेला उधान!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे गावातील प्रधानमंत्री आवास योजना 2025 /26 यामध्ये घराचे बांधकाम न करता जिओ टॅगीग चे बोगस फोटो अपलोड करून दुसरा हप्ता टाकण्यात आलेला आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेतून लाभ व पत्नीला पंतप्रधान योजनेतून एकाच कुटुंबात दोन लाभ ते देखील कुठल्याही प्रकारचा बांधकाम न करता किंवा कुठले प्रकारचे पायाभूत रोवणी न करता कशा पद्धतीने यांना लाभ मिळत आहे हे संशयास्पद आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता ही नाही. आठ दिवसापूर्वी CO मॅडम हरताळे गावाला भेट देऊन घरकुला विषयी चौकशी केली पंचायत समितीतील घरकुल विभागाला व bdo साहेबांना बोगस लाभार्थ्यांचे पैसे टाकू नये अशा सूचना देऊन सुद्धा हाताळा गावामध्ये घरे न बांधकाम करता दुसरा हप्ता देण्यात येत आहे या भोंगळ कारभारावर बिडिओ साहेब व सीओ मॅडम काय कारवाई करतील याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button