आदिवासी नागरिकांचा फुटला टाहो ! ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी मुलांना ये-जा करताना करावी लागत आहे मोठी कसरत ! , हजारो आदिवासींसह अकोल्यात आंदोलन करण्याचा इशारा! , रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गट ग्रामपंचायत धोंडा-आखर सरपंच , ग्रामस्थांचा गंभीर आरोप!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे
अकोट .दि.7 डिसेंबर|
चिपी, भिली ,धोंडा , आखर या परिसरातील आदिवासी बांधवांना खूप कठीण यातना हल्ली भोगाव्या लागत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी मुलांना रस्त्यावरून ये-जा करत असताना अनेक दिवसापासून कठीण यातना सहन कराव्या लागत आहे. आदिवासी भागातील मुख्य रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या विरोधात आदिवासी नागरिकांनी आंदोलनाचा आक्रमक इशारा याप्रसंगी दिला आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका हा मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे सातपुडाच्या पर्वतरांगा यांच्या भोवताली लहान मोठ्या तांड्यामध्ये आदिवासी राहतात. यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यांच्यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला असून स्वातंत्र्य पूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे या आदिवासी भागात मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी याचा सुद्धा कायम अभाव राहिला आहे . कधी नव्हे ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना च्या माध्यमातून आडगाव ते धोंडा-आखर रस्त्याची दर्जोन्नती करण्याचे काम सुरू झाले त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात पहिल्यांदा रस्ता बघायला मिळणार अशा आशा पल्लवीत झाल्या परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा कंत्राट दाराकडून सुरू असून दहा ते पंधरा फूट खोल खोदून माती रस्त्यावर टाकल्या जात आहे. मातीवर कोणतीही योग्य प्रक्रिया व रोड रोलर नाही, पाण्याचा वापर नाही. जिवंत गिट्टी चा थर या रस्ता बांधकामावर दिसत आहे. गायरान, चिपी, धोंडा आखर आजूबाजूच्या सर्व रहिवासी असलेले आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास मोठा जीव घेणा प्रवास करावा लागत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी मुलांना ये-जा करताना खूप मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे मागील ७५ वर्षापासून त्रास सहन करीत असलेले आदिवासी बांधव आता मात्र आक्रमक झालेले आहेत ‘”आमच्या भाग्यात दर्जेदार रस्ता नाही पाण्याकरिता भटकंती व हक्काचा निवार्या पासून सुद्धा आम्ही वंचित आहोत” चिपी चे धरण सुद्धा हे सरकार पूर्ण करू शकले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत “या देशात आम्हाला मूलभूत सुविधा सुद्धा मिळू शकत नाही तर आम्ही मानवाचा जन्म घेऊन चूक केली का? असा प्रश्न या गावकऱ्यांनी उपस्थित केला त्यामुळे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा एकमेव होत असलेला रस्ता तरी दर्जेदार करावा अशी मागणी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित केली आहे अन्यथा कंत्राटदार ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.



