बुलढाणाविदर्भ

मिशन परिवर्तन अंतर्गत पोलीस विभागाकडून रक्तदान शिबीर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव ग्रामीण आणि शहर पोलिसांचा पुढाकार

शेगाव : बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मिशन परिवर्तन ह्या अभिनव संकल्पनेतून शेगांव ग्रामीण आणि शहर पोलिस स्टेशन आणि पोलिस मित्र परिवार शेगांव तालुका यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्दिष्ट लोकाभिमुख पोलिसिंग, सर्व धर्म समभाव व समाजप्रेम व्यक्त करणे तसेच रक्तदानाद्वारे अनेक गरजूंचे प्राण वाचविणे हे आहे.
“आओ लिखे मानवता की नई परिभाषा, रक्तदान कर दे जीवन को नई आशा” या ओळीना अनुसरून शेगाव येथील पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन येथे 31ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 9 वाजता आयोजित या रक्तदान शिबीरात पोलिस प्रशासन, पोलिस मित्र परिवार व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून हे रक्तदान शिबिर एक सामाजिक उपक्रम ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन शेगाव ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन यांचे कडून करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button