अकोलाविदर्भवैद्यकीय

तेल्हारा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयात अनेकांनी केले रक्तदान. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी.

तेल्हारा | प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय शाखा तेल्हारा येथे सोमवार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजीप्रकाशमणी दादी यांच्या १८ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात शहरातील अनेक बंधू-भगिनींनी रक्तदान केले . याप्रसंगी उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापन बघावयास मिळाले. याप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांनी अत्यंत समर्पण भावनेने रक्तदान केले. संपूर्ण वातावरण सेवाभाव, शिस्त, आणि सकारात्मक ऊर्जेने बहरून गेले होते. रक्तदानासोबतच प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे शिबिर अधिक उपयुक्त ठरले. समाजासाठी रक्तदानासारखी पवित्र सेवा करणे ही खरी ईश्वरी सेवा असल्याचा अनुभव सर्वांना आला. या शिबिरामुळे समाजात ऐक्य, आरोग्याची जाणीव आणि सेवाभाव यांचा सुंदर संदेश रुजला.

रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाकरिता प्रमिला दीदी व त्यांचे सहकारी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे डॉ.सुनिलजी जोशी व त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले असून यामुळे रक्तदात्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले . या कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ तसेच ईश्वरिय सौगात देऊन स्वागत प्रमिला दिदींनी केले सदर कार्यक्रमास डॉ.अशोक तापडिया माजी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय तेल्हारा, डॉ. विजय बडगे तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.राहूल सदाफळे, डॉ.महेश बोबडे, डॉ.विक्रम जोशी, डॉ.जायले , पत्रकार बंधू प्रशांत विखे, संदीप सोळंके ,गजानन उंबरकार ,ओम सुईवाल , योगेश विचे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व, त्याची गरज व ते का करावे ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच रक्तदानाबद्दल असलेले समज, गैरसमज ह्याबद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल भुजबले यांनी तर आभार प्रदर्शन श्याम बोडखे यांनी केले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पप्पू सोनटक्के, सतिष धरमकर, गोपाल भुजबले , श्याम बोडखे, गोपाल बाजोड, राजुभाई बोरकर, मनिष टावरी, योगेश चांडक , कपिल चांडक, विजय वाघमारे, दिनु, आकाश रुद्रकार, गजानन राठी, दुतोंडे, विजय पवार, विजय वाघमारे, शोभाताई टावरी, मीनाताई चांडक, वर्षाताई पोटे, कल्पनाताई नागोलकार यांचेसह प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा तेल्हाराचे सर्व भाऊ-बहिणींनी सहकार्य केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारीज तेल्हारा येथील शाखेत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून शासकीय रक्तकेंद्र जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला यांना सहकार्य केले . याप्रसंगी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे ब्रह्माकुमारीज शाखा तेल्हारा व जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button