बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हाऱ्यातील जनतेच्या समस्या सोडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्याचे नवनिर्वांचित शहराध्यक्ष संदीप खारोडे यांचे आवाहन!

बैठकीत अनेकांचा पक्ष प्रवेश.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतीनीधी.

तेल्हारा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी जाहीर पक्षप्रवेश केला तसेच याप्रसंगी नवनिर्वाचित शहराध्यक्ष संदीप खारोडे यांनी तेल्हाऱ्यातील जनतेच्या समस्या सोडवून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष करण्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले.

मा.आमदार अमोल मिटकरी साहेब यांच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला जिल्हा अध्यक्ष मा.मोहम्मद बदरुजमा आणि अकोला जिल्हा महासचिव विकास पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा शहरातील हि बैठक शहर अध्यक्ष मा.संदीप खारोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून यावेळी मा. जिल्हा महासचिव यांनी तेल्हारा शहराची नवीन झालेली प्रभाग रचना आणि बूथ कमिटी बांधणी वर सखोल मार्गदर्शन केले. तालुका कार्याध्यक्ष महेश पाटील खारोडे यांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणूक मध्ये पक्षाची रणनीती कशी असावी त्याबद्दल मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष संदीप खारोडे यांनी तेल्हारा शहरातील समस्या आपल्याला आपल्या पक्षाच्या माध्यमातून सोडवून जनतेपर्यंत उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांचे विचार पोहोचवून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्याचे यावेळी आवाहन शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले तर सचिन पोहरकार युवक शहर अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात युवकांना मार्गदर्शन केले , यावेळी काही नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या त्यामध्ये मा. संघर्ष गणेश बोदडे यांची शहर महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून सचिन गर्जे यांची शहर उपाध्यक्ष, अमीन शहा. यांची शहर उपाध्यक्ष, मुजाहिद कुरेशी ह्यांची शहर उपाध्यक्ष तर शेख फरीद यांची शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीमध्ये विकी मंगळे यांनी प्रास्ताविक केले , सूत्रसंचालन सुरज साळुंखे यांनी केले तर उत्कृष्ट आभार प्रदर्शन मुजाहिद कुरेशी यांचे होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button