बुलढाणा
चिंचोली येथे रस्ते चिखलमय

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप
शेगाव । तालुक्या चिचोली येथील रस्त्यावर पावसामुळे अतिशय चिखल झाला आहे. तसेच या रस्त्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणे अतिशय कठीण झाले आहे. -या पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही त्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी नागरिकांना येणे जाणे त्रास सहन करावा लागत आहे व
विद्यार्थ्यांकरिता हा जवळचा
रस्ता असल्याने विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून शाळेत जाणे फार त्रासदायक ठरत आहे. चिचोली ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे
शाळेतील विद्यार्थी येथे पडून जखमी झाल्याशिवाय येथे पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग काढल्या जाईल अशी चर्चा या गांवतील नागरिकांमध्ये होतं आहे



