खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

जिल्हा परिषद मराठी व उच्च माध्यमिक शाळेत 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा परिषद मराठी व उच्च माध्यमिक शाळेत 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.जी

रोकडे खामगाव प्रतिनिधीजनुना तालुका खामगाव येथे स्थानिक जिल्हा परिषद शाळेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी गजानन शिरस्कार ,तर प्रमुख उपस्थिती गावातील सेवानिवृत्त कर्नल परम शिव अनंतराव शेजव तसेच ग्रामपंचायत सरपंच अस्मिता ताई गवांदे माजी सरपंच सुवर्णाताई गोरे, माजी सरपंच अमोल गोरे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख अतिथी कर्नल परमशिव शेजव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी ,यांनी सहभाग घेतला गावातील इयत्ता 10 व 12 वी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार कार्यक्रम तसेच त्यामध्ये विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,व रांगोळी व चित्रकला स्पर्धेतील विजेते अंगणवाडी सेविका तसेच गावातील विविध क्षेत्रातील सेवा देणारे नागरीक यांचा सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला. तसेच स्वयंप्रेरणेने गावात मोफत शिकवणी वर्ग घेणारे राजिक भाई ,व शुद्धोधन शेजव यांनाही विशेष सत्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप गोरे, अमोल गोरे, अमोल गवांदे, राजूभाऊ खंडेराव, पंचशील क्रीडा मंडळ, आणि गावातील सर्व युवकांनी मोलाचे योगदान सहकार्य केले. अशा उत्साही वातावरणात जणूना गावात स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात यशस्वीपणे साजरा करण्यात आला….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button