अंतुर्ली फाटा येथे बेळी येथील कावड यात्रेचे स्वागत

अंतुर्ली फाटा येथे दादासाहेब रामभाऊ तराळ हॉल येथे भुसावळ जवळील बेळी येथील मा.भरत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रा आली असता यात्रेचे स्वागत करण्यात आले.कावड यात्रेचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांनी केले .यावेळी सोबत भुसावळचे भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, बाजार समितीचे सभापती श्री.वारके साहेब,माजी पं.स.सभापती गोलू पाटील,माफदाचे तालुकाध्यक्ष जितू भाऊ चोपडे,शिवाजी पाटील हे होते .यांचे सर्वांचे स्वागत बोदवड बाजार समितीचे सभापती श्री.सुधीर तराळ यांनी केले तसेच मान्यवरांचे स्वागत शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, पं.स.सभापती किशोर चौधरी,मा.सरपंच विलास पांडे,लोहारखेडा वि.का.सोसायटीचे चेअरमन मनोज पाटील,अनिल दुट्टे,बबलू कापसे,अमित देशमुख,राहुल पाटील,युवा सेनेचे पदाधिकारी श्री.सुधीर कुलकर्णी,संतोष साळुंखे,पवन पाटील, ग्रा.पं.सदस्य संपा महाजन ,अर्जुन वैदकर,पंकज पिंगळे,विलास काळे या मान्यवरांनी केले.सोबत मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक प्रवीण जावरे होते यावेळी विनोद भाऊ तराळ अध्यक्ष माफदा यांनी आभार तर अंतुर्ली चे मा.सरपंच कैलास दुट्टे यांनी सूत्रसंचालन केले.



