मुक्ताईनगरात नाथाभाऊंना समर्थनार्थ दुग्धाभिषेक

आज दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता, सारा समरजीत कॉम्प्लेक्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) विधानसभा क्षेत्र कार्यालय, मुक्ताईनगर येथे जळगाव जिल्ह्याचे विकासपुरुष, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे साहेब यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करण्यात आला.
ही भूमिका भाजपाने खडसे साहेबांच्या प्रतिमेवर केलेल्या केविलवाण्या आणि अशोभनीय आंदोलनाच्या तीव्र निषेधार्थ घेण्यात आली. अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत नाथाभाऊंनी माननीय रूपालीताई चाकणकर यांना 13 वेळा आदराने “ताई” म्हणून संबोधले होते. मात्र, या विधानाचा विपर्यास करून असत्याचा प्रचार करण्यात आला.
भाजपाने प्रफुल्ल लोढा यांनी उघडकीस आणलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातील पराभवाचा राग मनात ठेवून, असत्यावर आधारलेले हे आंदोलन रचल्याचा आरोप करण्यात आला. “सत्य कधीही लपवता येत नाही, आणि राजकारणाच्या नावाखाली असत्याचा खेळ चालणार नाही,” असा ठाम संदेश या प्रसंगी देण्यात आला.
सत्याच्या समर्थनार्थ आणि अन्यायाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत, मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नाथाभाऊंच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करून त्यांना एकजुटीचे प्रतीकात्मक समर्थन देण्यात आले.



