बुलढाणामनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक
श्रीकृष्ण लीलामृत सप्ताहाचे आयोजन.

हिवरखेड (महेंद्र कराळे)
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे दि.९ . ८. ते १६ . ८ . २०२५ पर्यंत जगद्गुरु भगवान गोपाल कृष्ण जन्माष्टमी , भगवान श्री ज्ञानोबारायांच्या सप्तशतकोत्तर ( ७५० ) सुवर्ण महोत्सवी अवतिर्णोत्सव तथा ज्ञानेश आश्रमाच्या तेरावा वर्धापन दिन या त्रिविध कार्याचे औचित्य साधून वार्षिक नियमाप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण तसेच भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीकृष्ण लीलामृत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहामध्ये रोज पहाटे ५ ते ६ काकडा आरती ७ ते ८ विष्णुसहस्त्रनाम , गोपी गीत , भ्रमर गीत पठण , सकाळी ९ ते १ सामूहिक पारायण , दुपारी ३ ते ५ श्रीकृष्ण लीलामृत ( श्री गर्ग संहिता आधारित ) प्रवचन , संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्रौ ८ ते १० ज्ञानेश्वरी भावनिरूपण कथेचे छोटे खाणी आयोजन केले आहे . असे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.



