वरवट खंडेराव गावात घाणीचे साम्राज्य नागरिकांची आरोग्य विभाग दुर्लक्ष

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, संग्रामपुर
तालुका प्रतिनिधी, रतन भगत
वरवट खंडेराव गावात घाणीचे साम्राज्य:,=वरवट खंडेराव हे गाव संग्रामपूर तालुक्यातील एक छोटेसे गाव असून त्या ठिकाणी बऱ्याच समाजातील लोक हे सुख आणि सुखाने नांदत आहेत. मात्र या गावात बऱ्याच दिवसापासून गावकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांना समोर जावं लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या गावात असलेले घाणीचे साम्राज्य, या गावातील नाल्या फक्त बिल काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या काढण्यात येतात, मात्र भर पावसाळ्यामध्ये त्या नाल्यात खूप मोठ्या प्रमाणात केर कचरा आणि गाळ साचल्याने नाल्यातील पाणी हे नालीत न जाता वस्तीतील येजा करण्याच्या रस्त्यावरून वाहत असते त्यामुळे त्या ठिकाणी नालीतील कीटक आणि सूक्ष्म बारीक जीव जंतू ये जा करणाऱ्या रस्त्यावर येतात त्यामुळे त्याचा परिणाम थेट लोकांच्या आरोग्यावर होत असून येथील नागरिकांचे जीवन हे धोक्यात आलेले आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे बरेच साथीचे रोग पसरण्याची भीती गावातील नागरिक कडून व्यक्त केल्या जात आहे. गावातील सरपंच आणि सचिव यांच्याकडे नागरिकांनी बऱ्याच वेळा तक्रार केली असता ते या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत तरी या गावातील नागरिकांच्या आरोग्याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे .तसेच महत्त्वाचे म्हणजे गावातील मुख्य ठिकाण म्हणजे गावात जेव्हा आपण प्रवेश करतो त्या ठिकाणीच फार मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे यावरूनच त्या गावाची दशा काय असेल असे दिसून येते तरी शासनाने याकडे लक्ष देऊन वेळी उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांची तीव्र मागणी होत आहे..वरवट खंडेराव गावात घाणीच्या साम्राज्याचा फोटो खाली दिला आहे.



