अकोलाखानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हापत्रकारबुलढाणामहाराष्ट्रमुबईविदर्भसंपादकीय

दि. १ ऑगस्ट पासून राज्यात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवड्याचे आयोजन ! १५ ऑगस्टला होणार भव्य समारोप ! विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी

| अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघटनेचे केंद्रीय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्यातील, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शुक्रवार दि. १ ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत राज्यभरात (पर्धरवाडा) विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. संघटनेने पहिल्या टप्प्यात जुन -जुलै या महिन्यात केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा. रवींद्र मेंढे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्यालय प्रमुख – बाबाराव खडसे ह्यांच्या सह प्रदेशातील पदाधिकार्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात वृक्षारोपण आदि विविध उपक्रम राबविलेले आहे. पत्रकारांनी जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवावे असे पत्रकार संघाने धोरण ठरविल्यामुळे महाराष्ट्रतील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बैठक घेऊन जिल्ह्यांतील कार्यकारिणी, नुतनीकरण, तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावर वृक्षारोपण, रोगनिदान शिबिर, मेळावा, शालेय साहित्य वाटप करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. रविवार दि. ३ ऑगस्टला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवशी पत्रकार सहकारी पतसंस्था शिरजगांव कसबा येथे दुपारी २ वाजता पत्रकार संवाद मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे.
वरील कार्यक्रमात, उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांचा कार्यगौरव सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील पत्रकार व केंद्रीय प्रदेश तथा महिला मंच प्रदेश कार्यकारिणी, हजर राहाणे अनिवार्य आहे.

शुक्रवार दि. १५ ऑगस्टला संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफखान यासीनखान पठाण यांचा वाढदिवस , व यानंतर पंधरवडा उपक्रमाचा भव्य समारोप होणार आहे. त्यामध्ये उत्कृष्ट कार्य, जिल्हा बांधणी केलेल्या जिल्हा अध्यक्ष व पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात वरील प्रमाणे कार्यक्रम राबवावे. व तसा अहवाल केंद्रीय कार्यकारणीला पाठवावा. असे संघटनेने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले असल्याचे संघटनेचे सुरेश सवळे – केंद्रीय महासचिव, अशोक पवार केंद्रीय सचिव राजेंद्र भुरे, केंद्रीय उपाध्यक्ष, प्रदिप जोशी-केंद्रीय उपाध्यक्ष, माणिकराव ठाकरे केंद्रीय सदस्य, अंबादास सिनकर, अभिमन्यू भगत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, गोपाल सरनायक प्रदेश सचिव, सुरेशराव ढवळे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संघटक मनोज कमेट, सुरज यादव विदर्भ आरोग्य समिती अध्यक्ष, अरूणभाऊ कुलथे – प्रदेश सल्लागार, जगदीश बुलबुल मराठवाडा विभागीय अध्यक्ष, प्रियंका केदार महिला मंच विदर्भ
कार्याध्यक्ष, मंजुषा सागर महिला मंच प्रदेश अध्यक्षा, कांचन मुरके – महिला मंच प्रदेश सरचिटणीस, पायल बुलबुल संभाजी नगर- महिला मंच जिल्हा अध्यक्षा,
प्रसिद्ध प्रमुख – सागर सवळे, शहजाद खान, नितीन पवार आदींकडून प्राप्त माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button