प्रवाशांना सुविधा युक्त प्रवास मिळणार – सौ. अपर्णाताई कुटे शेगाव आगाराच्या ५ नवीन एसटी बसेस सेवेत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव जळगाव जामोद शेगाव मतदारसंघातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी माजी मंत्री आ.डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नातून शेगाव आगाराला नवीन पाच बसेस मिळाल्या असून या बसेसचे लोकार्पण सौ. अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते १५ जून रोजी शेगाव बसस्थानकात करण्यात आले आहे.
प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही नियमित प्रयत्न करीत असतो. शेगाव आध्यात्मिक शहर असून याठिकाणी येणाऱ्या प्रवासी व भक्तांना सुविधा युक्त प्रवास मिळण्यासाठी कुठे साहेबांनी पाठपुरावा केल्याने पाच नवीन बसेस मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता सुविधायुक्त प्रवास करता येणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय कुटे
यांच्या सौभाग्यवती अपर्णाताई कुटे यांनी केले आहे. याप्रसंगी भाजपा नेत्या सौ. कल्पनाताई मसने, माजी नगराध्यक्षा सौ. शकुंतला बुच, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष विजय भालतडक, भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा साखरे, संतोषबापू देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र ढोले, राजेंद्र हेलगे,
रवींद्र उन्हाळे, गजाननराव जंजाळ, राजु अग्रवाल, अमित जाधव, अनंता बरडे, आकाश नावकर, कमलाकर चव्हाण, श्रीधर हिंगणे, राजेश श्रीनाथ, विजय बुच, राजु सुरवाडे, डॉ. मंजुषा भुतडा, रुपाली बरहे यांच्यासह शेगाव आगारातील कर्मचारी वृंद उपस्थित होते



