तेली समाजाच्या वतीने तेल्हारा शहरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न! विजय मनोहरराव घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अकोला जिल्हा

तेल्हारा | रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी तेल्हारा शहरामधील भागवत मंगल कार्यालय येथे तेली समाज मंडळाच्या वतीने आयोजित इयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षांमधील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न झाला.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन राठोड तेली समाज मंडळ तेल्हारा च्या वतीने करण्यात आले होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करत तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे व तेली समाजातील आर्थिक दृष्ट्या असक्षम गोरगरीब नागरिकांना मदत व्हावी या हेतूने त्यांच्या विकासाकरिता आपली स्व:मालकीची शेतजमीन दान करणाऱ्या दानशूर स्व. रामभाऊ सोनटक्के यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी मधील २३ विद्यार्थी व बारावी मधील ११ विद्यार्थी , अशा ३४ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र , पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर तेल्हारा येथील राठोड तेली समाज पंच मंडळ तेल्हारा चे अध्यक्ष अरुण अकोटकार , उपाध्यक्ष योगेश वीचे , सचिव अनिल धनभर , सहसचिव गंगाधर खोडे गुरुजी , कोषाध्यक्ष महेश साखरकर , तसेच सतीश चहाजगुणे, रवींद्र वासनकार , प्रशांत भागवत , आनंद भुजबले , निलेश धनभर , वामन वानखडे , सुरेश खोडे गुरुजी , डॉ. महेश बोबळे ,गणेश गोतमारे , पत्रकार बंधू कृष्णा फंदाट गुरुजी , अमित काकड , प्रदीप पोहणे यांचे सह आदी सदस्यांचा कार्यक्रमाचे सक्रिय सहभाग होता. सत्कार सोहळ्यानंतर लगेच उत्कृष्ट अल्पोपराची सुद्धा व्यवस्था याप्रसंगी तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. गुजरात येथील अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये २४० हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला याप्रसंगी घटनेतील मृत व्यक्तींना समाजाच्या वतीने सामूहिक याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. महेश बोबळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये प्रस्तावना सुरेश खोडे गुरुजी यांनी केली असुन उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. उज्वला साखरकर आणि सौ. सरिता वासनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश चहाजगुणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संपूर्ण समाजातील बंधू भगिनींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने तेली समाजातील बंधू-भगिनी विद्यार्थी -विद्यार्थिनी व त्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते.



