महाराष्ट्र

तेल्हारा शहरात विविध उपक्रम राबवून केला खा. अनुप धोत्रे यांचा वाढदिवस साजरा !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म. घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोला दि.२४/ मे : महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा खासदार अनुप संजय धोत्रे यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.२४ मे रोजी तेल्हारा मंडळ अध्यक्ष गणेश रोठे यांच्या नेतृत्वात तथा युवानेते अतुल विखे यांच्या नियोजनात प्रथमत: तेल्हारा शहराचे आराध्य दैवत श्री गौतमेश्वर महादेव संस्थान येथील शिवलिंगाला दुध व जलाभिषेक करून खा अनुप धोत्रे यांच्या दीर्घायुष्या करिता प्रार्थना करण्यात आली . यानंतर ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील रुग्णांना फळ वाटप तसेच श्री रामदेव बाबा मंदिर येथे गरजु नागरिकांना अन्नदान करण्यात आले . शेगाव नाका येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले . यावेळी माजी तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रविण वैष्णव, गजानन नळकांडे, अमृतराव पाटिल, अनिल पोहने, राजु टोहरे, नरेश गंभिरे, सतिष जयस्वाल, लखन राजनकर, विजय देशमुख, ओम सुईवाल, गजानन गायकवाड, अनुप मार्के, रुपेश राठी, योगेश गंभिरे, मंगेश सोळंके, योगेश विचे, मयुर चहाजगुणे, माजी नगरसेवीका आरती ग. गायकवाड, मोनिका वाघ सुनिता बगाडे, गणेश इंगोले, प्रमोद सोनटक्के, देविलाल गव्हाणे, विजय तेल्हारकर, ऋषिकेश चोपडे, विठ्ठल भाकरे, छोटु विखे, बजरंग खाडे , शिवा खाडे, ऋषिकेश ठाकुर, दिलीप पिवाल, अंकुश सपकाळ, हरिष तापडीया, दिपक अहेरकर, प्रतिक ठाकरे, सागर नेरकर, यश अवचार, राहूल धामोळे ,तेजस सोनवळ, रवि शर्मा यांच्या सह तेल्हारा तालुका व शहर , माजी नगरसेवक , युवा मोर्चा , महिला आघाडी , पदाधिकारी , आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button