बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वाळू माफियाकडून तहसीलच्या पथकास अॅट्रॉसिटीची धमकी; गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : वाळू तस्करी

करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या उद्देशाने मन नदी पात्राच्या आडसूळ परिसरात तपासणी करीत असताना शेगाव तहसीलच्या पथकास वाळू माफियाकडून अॅटॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे. या गंभीर घटनेची तक्रार शहर पोलिसांत देण्यात आली असून पोलिसांनी तीन जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेसंदर्भात फिर्यादी तथा शेगाव तहसील कार्यालयाचे ग्राम महसूल अधिकारी श्रीकांत डिगांबर हाके (३८) यांनी शहर

पो. स्टे. ला दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी हे पथकातील सहकाऱ्यांसह वाळूची तस्करी करणाऱ्यांविरूध्द कार्यवाही कामी मन नदी पात्राच्या आडसूळ परिसरात असताना आरोपी हा त्याचे ताब्यातील निळ्या रंगाचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २८ एजे ६८०९ क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्याअर्थाब्रास रेती किंमत २ हजार रूपयांची विनापरवाना चोरून नेत असतांना मिळाला. पोलिसांनी आरोपी नामे गणेश नारायण पारीसे, भगवान सुखदेव इंगळे व आनंद भगवान इंगळे सर्व रा. आडसूळ हे तिन्ही आरोपी घटनास्थळावर रेती

खाली करून ट्रॅक्टर घेवून सरकारी कामात अडथळा करून पळुन गेले. परंतु जाता जाता फिर्यादी व पथकातील सहकारी यांना भगवान सुखदेव इंगळे यांनी म्हटले कि, ‘तुम्ही तर आमचे नांदात लागले तर तुमच्या विरुध्द खोटा अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करणार’ अशी धमकी दिली. अशा तोडी रिपोर्ट वरून उपरोक्त आरोपींविरूध्द कलम कलम २२१,३०३(२),३ (५) भान्यासं, सहकलम २१ (१) महाराष्ट्र खान आणी खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस धनराज माने हे करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button