बुलढाणामहाराष्ट्र
राष्ट्रीय ओबीसी महासंघ बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्षपदी सुरज बेलोकर यांची निवड….

जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सुरज बेलोकार यांनी आतापर्यंत केलेले विविध मोर्चा, अधिवेशने, आंदोलने या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बुलढाणा युवा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा येथे होणाऱ्या दहाव्या राष्ट्रीय अधिवेशना विषयी पुणे येथे 27 एप्रिल रोजी कार्यकारी बैठक पार पडली या महत्वपूर्ण बैठकीत बुलढाणा जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष म्हणून सुरज बेलोकर यांना राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे राष्ट्रीय महासभा सचिव राजुरकर राज्य संघटक विनोद ड वंगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले .त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे…..



