बुलढाणामहाराष्ट्र

पेट्रोल भरतांना दुचाकी पेटली; अनर्थ टळला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव: मुख्य रस्त्यावरील
एसबीआय बँकेला लागून असलेल्या पालडीवाल यांच्या पेट्रोल पंपावर ११ मे रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास एक दुचाकीस्वार आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून घेत असतानाच पेट्रोलच्या टाकीने अचानक पेट घेतल्याची घटना पहली. यावेळी पंपावरील कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून अग्निशामक रोधक सिलेंडरने आग विझवून पुढील अनर्थ टाळला.

या घटनेमुळे पेट्रोल पंपावर मोठी धावपळ उडाली होती. परंतु दुचाकीच्या टाकीला आग कशी लागली याचे कारण कळू शकले नाही. मात्र पेट्रोलपंप येथील कर्मचारी व ग्राहकांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पेट्रोल पंपावर मोबाईल वापरताना

काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. गाडी चालवताना मोचाईलवर बोलू नये, पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नये, या गोष्टींची खबरदारी घेतली गेली नाही तर धोका निर्माण होतो.

पेट्रोल पंपावर कोणी फोनवर बोलत असले तर त्या ठिकाणी असलेले कर्मचारी लगेच फोन ठेवायला सांगतात. तसेच पेट्रोल पंपावर धुम्रपान करू नका, मोबाईल फोन वापरु नका, अशी चेतावणी देणारी चिन्हही असतात. पेट्रोल

पंपावर मोबाईल न वापरण्यामागे कारण मोबाईल मधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे पेट्रोलची वाफ लगेच पेट घेते. तसेच जवळच्या धातूच्या वस्तूंमध्ये विद्युतप्रवाह निर्माण करू शकते. यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईल वापरता येत नाही. पालडीवाल यांच्या पंपावर झालेल्या घटनेमुळे पेट्रोल पंप चालक दक्ष झाले असून पंपावरील कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button