डॉ. गो. खे. महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
गाडेगाव / तेल्हारा :
स्थानिक डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयामध्ये कला व वाणिज्य याची दोन्ही शाखेचे विद्यार्थी 12 वी परीक्षेला प्रविष्ट झाले होते .कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 78.11 टक्के लागला असून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 40 टक्के लागला .
सदर महाविद्यालयातून तसेच वाणिज्य शाखेतून प्राविण्य प्राप्त विद्यार्थी शैलेश प्रमोदराव पाथ्रीकर ८८.०० % गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आला आहे. गौरव हरी गव्हांदे 87.83 % गुण घेऊन द्वितीय आणि गायत्री मोहन चिकटे 87.00% गुण घेऊन आलेली आहे तसेच कला शाखेमधून ज्ञानेश्वरी मधुकर चोपडे 78.50 तर द्वितीय ममता सुरेश इंगळे 77.67 व तृतीय साक्षी बजरंग शिवरामे ७४.८३ गुण मिळवले आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमामधून प्रथम वैभव मनोहर माठे 68.17 तर प्रदीप रामेश्वर चितोडे 56.83 घेऊन द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे.
याप्रसंगी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी देशमुख तथा सर्व कार्यकारणीसह प्राचार्य डॉ. गोपाल ढोले , कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. योगेश कोरपे , एच.एस.व्ही.सी विभाग प्रमुख प्रा. प्रशांत गेबड , प्रा. झांमरे , प्रा.डॉ. मिसाळ, प्रा .बोकारे ,प्रा. चक्रे, प्रा. मेटांगे, प्रा. वानखडे , प्रा. नितनवरे प्रा . कु. गवई , संगणक शिक्षक अनंत सोनमाळे , अभिजीत लोखंडे व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले.



