बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बांधकाम मजुरांच्या हक्कावर गदा

बनावट प्रमाणपत्र वाटपप्रकरणी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

बुलढाणा प्रतिनिधी उषा इंगळे

जळगाव जा.

तालुक्यातील जामोद येथे बांधकाम कामगार म्हणून अपात्र लाभार्थ्यांना खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे लाभदेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चौधरी नावाच्या ग्रामसेवकानेच ही शिफारस

करून प्रमाणपत्र वाटप केल्याचा आरोप करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी शेख युनूस (सन्मान स्वतंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, बांधकाम कामगार संघटना) यांनी गटविकास अधिकारी

संदीप मोरे यांना अधिकृत निवेदन सादर केलं.

निवेदनात म्हटले आहे की, अपात्र लाभार्थ्यांना बनावट मार्गाने प्रमाणपत्र वाटप करून शासनाच्या योजनांचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यामुळे खरे बांधकाम कामगार लाभापासून वंचित राहत आहेत.

या निवेदनात संबंधित ग्रामसेवक चौधरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणी झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी निवेदन स्विकारून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन आहे. दिलं

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button