आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

शिवसेनेतील राजकारणापलिकडील शतृत्व

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

जळगाव

शिवसेनेतील राजकारणापलिकडील शतृत्व

     जे लोक शिवसेनेत राहून नगरसेवक झाले, महापौर झाले, आमदार झाले, मुख्यमंत्री झाले , मंत्री झाले तेच शिवसेना सोडून गेले.पक्ष फुटतो, पक्षांतर होते.हे नवीन नाही.पण ठाकरेंचे  शिवसैनिक ठाकरे विरोधात आग ओकतात.इतकी कि हा माणूस कोणत्या शाळेत शिकला असेल?असा प्रश्न पडतो.

छगन भुजबळ यांना ठाकरेंनी कोठून कुठपर्यंत पदावर पोहचवले.पण ते सोडून गेल्यावर स्वताचे मतलब पाहावे ना! नाही.ते ठाकरेंचे जानी दुश्मन बनले.कांग्रेसमधे जाऊन गृहमंत्री झाल्यानंतर म्हणे एकदा बाळासाहेबांना जेलमध्ये टाकणारच.का असेल इतका राग?जर खरोखरच राग होता तर शिवसेनेत राहून तर बोलले नाही.कि , बाळासाहेब,मला तुमची भुमिका आवडली नाही.पण बाहेर पडून इतके विष ओकले कि,कोब्रा सुद्धा विषबाधा होऊन मरून गेला असता.इतके विष तर भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी असे कोणीही ओकले नाही.


त्यानंतर नारायण राणे.कोणत्या स्तरावरचा माणूस?ठाकरेंनी चक्क मुख्यमंत्री बनवले.बाप रे!काय नशीब!पण ते जेव्हा शिवसेना सोडून गेले तर स्वताचे मतलब पाहावे ना! नाही.ते हात धुवून लागले .ठाकरेंच्या विरोधात नको ते आरोप करीत राहिले.तिन पिढ्यांचे वाभाडे काढले.म्हणे आदित्य त्या बलात्कार आणि खून प्रकरणात आहे.इतके विष तर भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी असे कोणीही ओकले नाही.
नंतर आता हे एकनाथ शिंदे.कमालच केली! एक सामान्य माणूस.नगरविकास मंत्री बनवले.पैसाच पैसा.हात घालतील तिथे पैसा.तरीही या शिंदेंनी ठाकरेंना दगा दिला.फक्त एकटे दुकटे नाही तर बाया माणसे धरून चाळीस आमदार.सोबत इतर पक्षाचेही गोड,कडू आमदार.ही फूट ठाकरेंना इतकी महागात पडली कि पक्ष सापसीडीवरून घसरत तळाशी आला.गोधळी इतकी फाटली कि टाके घालणे शक्यच झाले नाही.
शिवसेनेतून फुटलेले इतर आमदार सुद्धा ठाकरेंना महंमद अली जीना पेक्षा चुकीचे समजतात.म्हणे हिंदुत्व सोडले.हिंदू धर्म सोडला.अरे बापरे!पक्ष फोडला.पळवला.तर धर्मातून सुद्धा हद्दपार करणार का? धर्मातून बहिष्कृत करणार का?


नंतर तर सरन्यायाधीश चंद्रचूड या मराठी माणसाने मराठ्यांची शिवसेना मातीमोल केली.नजरचुकीने नाही.अगदी जाणिवपूर्वक.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निर्माण झालेल्या शिवसेनेचे मराठी माणसे इतके मातेरे करतील अशी अपेक्षा नव्हतीच.
कांग्रेस मधून अनेक नेते बाहेर पडले.मोरारजी देसाई.व्ही पी सींग.निलम संजीव रेड्डी,शरद पवार.ममता बैनर्जी.वायसीआर.केसीआर.विखे पाटील, अशोक चव्हाण, डॉ उल्हास पाटील.पण त्यांनी कांग्रेस सोबत इतके शत्रुत्व घेतले नाही.उलट काहींनी तर कांग्रेस नेत्यांची क्षमा मागितली.काही तर सोबत जाऊन युपीए बनवले.सरकारमधे सामील झाले.मंत्री बनले.वेगळे झालेल्या भाऊसारखे एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झाले.
असे मात्र शिवसेना सोडून गेलेल्या लोकांनी केले नाही.का केले नाही? मराठी माणसे एकाच पक्षात लहानाचे मोठे झाले.स्वार्थ होताच.पण इतका राग, द्वेष,मत्सर?इतका तर रावणाने सुद्धा रामाविषयी बाळगला नव्हता.इतका राग तर पेशव्यांनी औरंगजेब विषयी बाळगला नव्हता.जे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.पण शिवसैनिकच सेनाप्रमुखांच्या उरावर का बसले?का बसतात?यांचा अभ्यास उद्धव ठाकरेंनी करणे आवश्यक आहे.राजकारणापलिकडचे शतृत्व का?
मला वाटते, ठाकरे पितापुत्रांनी जाणतेपणी याच प्रवृत्तीची माणसे शिवसेनेत घेऊन संघटना बनवली आहे.ही माणसे शिवसेनेत आली,सत्तेवर आली, श्रीमंत झाली म्हणून विषारी झाली, गद्दार झाली,असे नाही.मुळातच ही माणसे राजकीय मनोवृत्तीची, सामाजिक प्रवृत्तीची नव्हती.आजही उद्धव ठाकरे हिच चूक रिपीट करीत आहेत.ते दुरूस्ती करायला तयारच नाहीत.मर्जी त्यांची.पक्ष त्यांचा.भविष्य त्यांचे.तुका म्हणे,जे जे पुर्वसंचित केले,तयासारखे भोगणे प्राप्त झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button