मुक्ताईनगर येथे प्रारंभिक मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेची बैठक संपन्न

प्रारंभिक मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन मेढे : तालुका पदाधिकारी यांनी केला सत्कार
मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन, नवी दिल्ली या संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांचे आदेशाने व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांचे शिफारशीनुसार जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मुक्ताईनगरचे तालुका अधिक्षक मोहन मेढे यांची नियुक्ती केली आहे.
मुक्ताईनगर येथे मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेची तालुका शाखेची बैठक दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी शासकीय विश्राम गृहावर मोहन मेढे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सदरचे बैठकीत सचिव हकीम चौधरी यांनी मागील एक वर्षाचा लेखाजोगा सविस्तरपणे पदाधिकारी यांचे समोर मांडून आढावा दिला. तसेच वर्षभरात संघटनेच्या माध्यमातून व महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देऊन तसेच आलेल्या तक्रारीचे निवारण करून वेळेवर बैठका घेऊन महिलांवरती अन्याय अत्याचाराच्या घटनेची दखल घेऊन प्रशासना समोर मांडुन पिडीतांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने पाठपुरावा करून अशा उत्कृष्ट कामाची दखल घेऊन मोहन मेढे यांची जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती बद्दल साहित्यिक अ.फ.भालेराव, पत्रकार संदीप जोगी, व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी शाल पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. तसेच संघटनेचे नवीन वर्षाचे सर्व पदाधिकारी यांना नुतन ओळखपत्र जिल्हाध्यक्ष मोहन मेढे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. प्रसंगी सदरचे बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ.अ .फ भालेराव उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगतात सांगितले की, भारतीय राज्यघटनेत संविधानात आपल्याला मानवाचे हक्क व अधिकार आधीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे. संविधानाचे वाचन करणे गरजेचे आहे व मानव अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत देणार असे सांगितले. मुक्ताईनगर तालुका शाखेचे पदाधिकारी जगन्नाथ चांगदेवकर, बी. डी .गवई, एन. जी. शेजोळे, विजय खराटे, रामदास मिस्त्री, भारती लोखंडे, धनंजय सापधरे, चंद्रकांत रावाये, राजेंद्र वानखेडे, पत्रकार आतिक खान, प्रमोद सौंदळे, राजेश चौधरी, संदीप जोगी, पंकज वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव हकीम चौधरी यांनी केले तर आभार विजय खराटे यांनी मानले.



