महाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करून घोषणा करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन होणार

अकोला प्रतिनिधी

चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करून घोषणा करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन होणार ; पूर्णाजी खोडके विदर्भ युवा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

अकोला : राज्यसरकार सत्तेवर येऊन शंबर दिवस पुर्ण झाले . मा‌ देवेंद्र फडणवीस पुर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाले. परंतु तिन महीन्यात जनतेच्या हिताचा एकही निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही.उलट महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. तिन वर्षांपासून नापीकी आहे. गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. स्त्रीयावरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. कायद्याचा धाक नाही.
सत्तेवर येण्यापूर्वी मा.देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, लाडक्या बहीनींना एकवीसशे रुपये महिना करु. उलट दहा लाख महीला अपात्र असल्याचे सरकार सांगत आहे. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे , शेतकरी पुत्र, तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी केली आहे, जर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर केली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. गावोगावी ग्रामपंचायत आमसभेत सर्व सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावं अशी मागणी ठराव होत आहे. सर्व आश्वासनाची, आठवण सरकारने ठेवावी व अमंलात आणावे अशी मागणी करण्यात आली जर सरकार याकडे दुर्लक्ष करेल तर उग्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी, शेतकरी पुत्र तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस या वृत्तवाहिनी च्या माध्यमातून एका पत्रकाद्वारे केली आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button