खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीयसामाजिक

मुक्ताईनगरीत आजपासून वारकऱ्यांचा कुंभमेळामान्यवरांकडून यात्रौत्सवाचे ध्वजपूजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर……

आदिशक्ती मुक्ताई व योगिराज चांगदेव महाराज या गुरूशिष्य भेटीच्या पर्वावर माघवारी महाशिवरात्र यात्रौत्सवाचे ध्वजपूजन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्याने मुक्ताईनगरीत आजपासून वारकऱ्यांचा कुंभमेळा भरणार आहे.
माघमहीन्यात महाशिवरात्री पर्वावर गुरू संत मुक्ताबाई व शिष्य चांगदेव महाराज यांच्या अनुग्रह दिनाच्या पर्वावर परंपरेने शेकडो दिंड्या पालख्यासह लाखो वारकरी वारीस येतात .मुक्ताबाई समाधीस्थळी मुळमंदिर कोथळी येथे यात्रौत्सवाचे ध्वजपूजन उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
तहसीलदार गिरीश वखारे,संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील ,विश्वस्त सम्राट पाटील,पुजारी ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे ,मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे हभप.पंकज महाराज पाटील,छोटूभाऊ भोई,पंकज राणे,पंकज कोळी,गणेश टोंगेआदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्यांदाच यात्रौत्सवाचे सुक्ष्म नियोजन
जळगाव जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद यांनी चांगदेव मुक्ताई यात्रेकरिता उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची इन्सीडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.यात्रौत्सवाचे नियोजना करिता अकरा विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक यांनी करावयाच्या कामाची जबाबदारी दिली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सुक्ष्म नियोजनातून यावर्षीचा यात्रौत्सव पार पडणार आहे.
SDRFचे जवान तैनात
जुने मुक्ताई मंदिर कोथळी व चांगदेव मंदिर येथे SDRFचे पथक 37जवानसह प्रथमच दाखल झाले आहे.अग्निशमन वाहन,रूग्णवाहीका सज्ज आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button