रामानंद नगर पोलीसांची उत्कृष्ट कामगीरी एकाच वेळेत एकुण 08 घरफोड्या केल्या उघड 05 सराईत आरोपीतांना केले जेरबंद व 10 तोळे सोने व 650 ग्रॅम चांदी तसेच LED TV असा मुद्देमाल केला हस्तगत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत होणारे घरफोड्या बाबत विशेष मोहीम राबविणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेश्वर रेड्डी, सो यांनी दिलेल्या सुचनेवरुन मा. अपर पोलीस अधिक्षक सो, श्री.अशोक नखाते व मा. पोलीस उप अधिक्षक, जळगाव उपविभाग श्री. संदिप गावीत सो यांचे मार्गदर्शनानुसार रामानंद नगर पोलीस स्टेशन हडितील महाबळ परीसरात झालेल्या घरफोड्या हया सागर शिवराम डोईफोडे व त्यांच्या साथीदारांनी केल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने संशयीत सागर शिवराम डोईफोड यास ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता, त्याने रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल 1) रामानंद नगर पोलीस स्टेशन CCTNS No.14/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 331(3), 331(4) प्रमाणे 2) रामानंद नगर पोलीस स्टेशन CCTNS No.338/2024 3) रामानंद नगर पोलीस स्टेशन CCTNS No.294/2024 4) रामानंद नगर पोलीस स्टेशन CCTNS No.04/2025 5) रामानंद नगर पोलीस स्टेशन CCTNS No.42/2025 यातील 6) रामानंद नगर पोलीस स्टेशन CCTNS No.43/2025 असे एकुण 06 घरफोडी गुन्हयाची कबुली दिली आहे. तसेच वरील नमुद एकुण 06 गुन्हयातील गेला मालापैकी एकुण 10 तोळे सोने व 650 ग्रॅम चांदी तपासात हस्तगत करण्यात आली आहे.
तसेच 1) नितेश मिलींद जाधव 2) दिपक विनोंद आढाळे 3) रवि भागवत सोनवणे 4) अनिल ऊर्फ मारी भगवान सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन येथील CCTNS No. 344/2024, CCTNS No.362/2024 दाखल गुन्हयाची कबुली दिले वरुन यातील गेला माला पेकी त्यांनी LED TV व इतर मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो, श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, श्री. अशोक नखाते व मा. पोलीस उप अधिक्षक जळगाव उपविभाग श्री. संदिप गावीत सो यांचे मार्गदर्शनानुसार प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे सहाय्याने सफो संजय सपकाळे, पोहेको/जितेंद्र राजपुत, पोहेकों/जितेंद्र राठोड, पोहेकॉ सुशिल चौधरी, पोहेको इरफान मलिक, पोना/हेमंत कळसकर, पोना/रेवानंद साळुखे, पोना/विनोंद सुर्यवंशी, पोशि/रविंद्र चौधरी, पोशि उमेश पवार अशांनी केली असुन वरील नमुद आरोपी मजकुर यांचे कडुन एकुण 8,00,000/- रुपये किमतीचे सोने व एकुण 60,000/- रु किमतीची चांदी तसेच एकुण 10,000/- रु किमतीची LED TV व इतर मुददेमाल हस्तगत केला आहे. तसेच नमुद सर्व गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, राजेंद्र गुंजाळ रामानंद नगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनानुसार सपोनि/विठठल पाटील व पोउपनि प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक, रामानंद नगर पो.स्टे. जळगांव



