शहरामध्ये दुचाकी चोराचे धुमाकूळ

राहुरी प्रतिनिधी
राहुरी शहरात पुन्हा दुचाकी चोरी च सत्र सुरु
राहुरी शहरातील शिवाजी चौक येथुन आज दि. ३१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात भामट्याने एका दुकाना समोर उभी असलेली दुचाकी चोरुन नेली. सदर घटना सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झालीय. ऋषिकेश शिरीष बुऱ्हाडे हे राहुरी शहरातील शिवाजी चौक येथे राहत असुन त्यांचे प्लाझा फॅशन नावाचे कापड दुकान आहे. ऋषिकेश बुऱ्हाडे यांनी त्यांच्या कडील एम एच १७ सी क्यु ८५८१ क्रमांक ची दुचाकी काल रात्री १०.३० वाजता नेहमी प्रमाणे त्यांच्या दुकाना समोर लावली होती. ऋषिकेश बुऱ्हाडे यांचे वडील शिरीष बुऱ्हाडे हे पहाटे पाच वाजे दरम्यान बाहेर गावाहून घरी आले, तेव्हा त्यांना दुकाना समोर त्यांची दुचाकी दिसली नाही. त्यांनी दुकाना समोरील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा पहाट १.४५ वाजता एक अनोळखी भामटा तोंडाला मास्क लावून आला. त्याने दुचाकीला चावी लावून दुचाकी चालू केली. त्यानंतर तो भामटा दुचाकी घेऊन पसार झाला. सदर घटना सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाली. या घटने बाबत ऋषिकेश शिरीष बुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ब) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.दिपक साळवे ऍक्टिव्ह मराठी राहुरी



