ओला विरोधात मकासरे यांचे मुंबईत आमरण उपोषण

वळण (प्रतिनिधी)- वादग्रस्त पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांचे वर कायदेशीर कार्यवाही करत अहिल्यानगर येथून त्यांची हकलपट्टी करावी अन्यथा येत्या 26 जानेवारी 2025 रोजी आपण पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत अशी माहिती वळण तालुका राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय अण्णासाहेब मका साहेब यांनी दिली.
पोलीस महासंचालकांना दिलेल्या निवेदनात श्री मकासरे यांनी म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप आहेत त्यांच्याविरोधात अहिल्या नगरमध्ये राजकीय सामाजिक संघटनेने ऐतिहासिक अनेक उपोषणे आंदोलने केली आहेत. अवैध व्यवसायांना पाठबळ देणे व्यापाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून त्यांच्याकडून आर्थिक माया गोळा करणे असे उद्योग मोठ्या प्रमाणात ओला यांच्याकडून सुरू आहेत असा आरोपही श्री मकासरे यांनी केला आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यात आजही दारू मटका जुगार गांजा अवैध्य व्यवसाय सर्रास सुरू आहेत. ओला यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार अर्जही दाखल असून तो न्यायप्रविष्ट आहे, असे श्री मकासरे म्हणाले.
दरम्यान, राकेश ओला यांची जिल्हा बाहेर जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आपण आपली भूमिका बदलणार नसून येथे 26 जानेवारी रोजी पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण करणार असल्याचे मकासरे म्हणाले.



