स्टार भारत लाईव्ह बातमीची दखल;मुक्ताईनगर हिरो दुचाकी शोरूमवर आरटीओ अधिकाऱ्यांचा छापा.

मुक्ताईनगर: जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दुचाकी वाहन विक्री होत असल्याच्या चर्चा अनुषंगाने हॅलो मलकापूर वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केली असता जळगाव वाहतूक विभागाने बातमीची दखल घेत आज मुक्ताईनगर हिरो शोरूम वरती आरटीओ वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यानी छापे टाकले.
याबाबत सविस्तर असे की मुक्ताईनगर शहरात विना परवाना दुचाकी विक्री सुरु असल्याची चर्चा वारंवार प्रसार माध्यमांद्वारे बातमी प्रसिध्द होत होत्या.त्या अनुषंगाने मुक्ताईनगर येथील हिरो कंपनीचे दुचाकी शोरूम ओम श्री मोटर्स मध्ये RTO विभागाकडून छापे घालून कारवाई कऱण्यात आल्याची महिती आहे. मात्र कारवाई संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता ,”आम्ही कारवाई करणार,करत आहे असे सांगितले शिवाय सायंकाळी कारवाईचा आढावा घेण्यासाठी असिस्टंट आरटीओ अधिकारी बागडे साहेब यांना कॉल केला असता अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळले. यावरून कारवाई संदर्भात जळगाव आरटीओ यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



