जळगावा जिल्हामहाराष्ट्र

किशोरआप्पा बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

स्टार भारत लाईव्ह

विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींसाठी योजनांचा आढावा आमदारांनी घेतला

प्रतिनिधी :

येथे किशोरआप्पा बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वामी लॉन्स येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी १०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. किशोरआप्पा पाटील होते.

आ.किशोर पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. एमपीएससी आणि यूपीएससी व्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी करिअर केले पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजेच करिअर नव्हे, प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावण्याची संधी युवकांना आहे, असे मार्गदर्शन केले. यावेळी राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी योजनांचा आढावा आमदारांनी घेतला.

यांची लाभली उपस्थिती

याप्रसंगी राजेंद्र चिंचोले, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, युवा नेते सुमित पाटील, किशोर बारावकर, गंगाराम पाटील, प्रवीण ब्राह्मणे, जितेंद्र जैन, चंद्रकांत धनवडे, प्रमोद सोनार, हेमंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भदाणे, पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, कर निरीक्षक कासार उपस्थित होते. प्रास्ताविक सुमित पाटील तर सूत्रसंचलन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button