Uncategorized
जि.परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जनुना येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती उस्ताहात साजरी…

….
जी .डी .रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव, जवळ असलेल्या जनुना तालुका खामगाव येथील जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळा इथे दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी स्थानिक जिल्हा परिषद शाळा येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक तसेच शाळा सुधार समितीचे अध्यक्ष यांनी पुष्पहार अर्पण केले. व गावंडे सर यांनी तसेच मुख्याध्यापक सर यांनी जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक गण ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका ,तसेच गावातील प्रसिद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुरी सर यांनी केले……✒️



