महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील तालुका राहुरी येथे एक दुर्दैवी घटना घडलीपोहायला गेलेल्या चार मुलांपैकी एकाचा पाण्यात बुडवून मृत्यू.

दिनांक 8/1/25 रोजी राहुरी कृषी विद्यापीठ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय चे पाच विद्यार्थी शाळेतुन दुपारच्या सुट्टीमध्ये ओम जगदाळे,युवराज मोरे,संकेत तरटे,तेजस कांदे वय वर्ष 15 इयत्ता दहावी मध्ये शिकत असताना हे विद्यार्थी शिक्षकांची नजर चुकवून मुळा उजवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेले असता चार पैकी दोन विद्यार्थी संकेत तरटे राहणार राहुरी,तेजस कांदे राहणार डिग्रस ता.राहुरी हे कपडे काढून पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने तरीही पाण्यामध्ये मौज मस्ती करीत असताना अचानक दोघांपैकी संकेत तरटे हा मुलगा बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा मुलगादेखील पाण्यात बुडू लागल्यामुळे एकच गोंधळ व आरडा ओरडा केल्याने कॅनॉलच्या शेजारीच राहत असणारे प्रशांत गावडे,भानुदास रोडे,अजय गावडे सर्व राहणार डिग्रस या तरुणांनी हा आवाज ऐकला व कुठलाही विचार न करता आवाजाच्या दिशेने गेले असता पाण्यामध्ये उडी मारून या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन पैकी एक जण पाण्याचा जास्त प्रवाह असल्याने पाण्यामध्ये खोलवर जाऊन वाहत गेला मात्र दुसऱ्या मुलाला तेजस कांदे याला या शेतकरी मुलांनी पोहत जाऊन पाण्याच्या बाहेर ओढत काढले मात्र तोपर्यंत दुसरा मुलगा संकेत तरडे काही क्षणात दिसेना असा झाला पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत गेला ही घटना सायंकाळी साडेचार च्या दरम्यान घडली असता कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षारक्षक यांनी घटनेचे ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्येच हजर झाले व शोध मोहीम चालू केली या घटनेची जिल्हा परिषद चे सदस्य धनंजय गाडे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ही तत्काळ पाटबंधारे अधिकारी श्री सायली पाटील यांना फोन करून पाणी बंद करण्याचा विनंती केली.अखेर त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी या मुळा उजवा कालवा चे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला काही पोहोता येणाऱ्या मुलांना हाताशी धरून सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्रभर सर्व नागरिक व राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी शोध मोहिम चालू ठेवली असता ? रात्रभर कुठेही या मुलाचा शोध लागला नाही मात्र?? दुसऱ्या दिवशी गुरुवार 11/30 च्या दरम्यान मध्ये गावडे वस्ती डिग्रस येथे एका युवाकला पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असताना आढळले त्यांनी समोर जाऊन पाहिले असता एक डेड बॉडी लोखंडी अँगला लटकलेल्या स्वरूपात संकेत तरटे या युवकाची बॉडी असल्याची खात्री झाली त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षारक्षक गोरक्षनाथ शेटे यांना फोन करून घटनेची माहिती दिली गावातील काही तरुणांना हाताशी धरून राहुल गायकवाड म्हाळु हळोनोर अविनाश भिंगारदे सोनू कोकाटे अक्षय गोसावी या युवकांनी पाण्यामध्ये उतरून मयताला बाहेर काढण्यास मदत केली त्यातील डिग्रज येथील कार्तिक कांदे या विद्यार्थ्याला वाचवण्यामध्ये यश आल्या ने त्याला पाण्याबाहेर काढले असता पुढील उपचारासाठी नगर येथे तातडीने हलवण्यात आले आहे.यातील मयत विद्यार्थी संकेत तरटे याचे वडील राहुरी कृषी विद्यापीठ येथील भाजीपाला येथे कृषी सहाय्यक पदावर नोकरी करीत असल्याचे समजते.या चारी ही मुलांची शाळेच्या बॅगेमध्ये शाळेचा युनिफॉर्म घडी घालून आढळला ही मुले घरून निघतानाच दोन ड्रेस घेऊन आले होते का? यापूर्वी शाळा बुडवून बाहेर फिरायला जात होते का ? जरी मुले गेले असले तरी शिक्षकांनी त्यांच्या आई-वडिलांना कल्पना का दिली नाही ? असा संशय निर्माण होत आहे. मात्र या घटनेला जबाबदार कोण अशी नागरिकांमधून चर्चा होत असल्याचे समजते

दीपक मकासरे सह न्यूज फोर्टिन

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button