सेंट्रल बँक ऑफ इंडिया टाटा एआय हाऊस इन्शुरन्स क्लेम मंजूर

मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अंतर्गत होम लोन केले गेलेले असताना मुक्ताईनगर येथील रहिवाशी विजय दिनकर राणे यांना होम लोन 15 लाख 40 हजार रुपये देण्यात आलेले होते मात्र गृह लोन दिले असताना त्यांच्या बँक खात्याला नॉमिनीज म्हणून सेंटर बँक ऑफ इंडिया च्या खात्याला रत्ना विजय राणे असे आहेमुक्ताईनगर येथे विजय दिनकर राणे यांना 2/11/2024 रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला व मृत्यू पावले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व त्यांची मुलगी असे त्यांना लाभार्थी आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथून होम लोन करत असताना मुक्ताईनगर अंतर्गत टाटा एआय च्या पॉलिसीच्या हाऊसिंग इन्शुरन्स हा त्यांनी केलेला होता. त्या अनुषंगाने मुक्ताईनगर येथे सेंट्रल बँक मॅनेजर गोपाल पाटील व सहाय्यक प्रबंधक म्हणून नितीन कोरसिया यांना टाटा एआय च्या कन्सल्टनच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली व सदर लाभार्थी म्हणून रत्न विजय राणे यांना देण्यात आले.त्या करिता मुक्ताईनगर येथील सेंट्रल बँक मॅनेजर गोपाल पाटील व सहाय्यक प्रबंधक नितीन कोरसिया यांनी. रत्ना विजय राणे यांना टाटा एआय यांच्या माध्यमातून हाउसिंग लोन च्या इन्शुरन्स 15 लाख 40 हजार रकमेचा जो त्यांच्या गृह कर्जाचां होता त्याकरिता त्यांना त्यांच्या वरती असलेले देयक म्हणून देणे होते. परंतु , ज्या व्यक्तीच्या नावाने म्हणजेच विजय दिनकर राणे यांच्या नावाने हे हाऊसिंग लोन असल्याने व त्यांनी टाटा एआय हाऊसिंग इन्शुरन्स चा क्लेम केलेला होता. त्यामुळे त्यांच्या पत्नीस रत्ना विजय राणे यांना तो गृह इन्शुरन्सचा क्लेम 15 लाख 40 हजार हा पूर्णपणे देण्यात आलेला आहे. व त्यासोबत सेंट्रल बँक मॅनेजर गोपाल पाटील सहाय्यक प्रबंधक नितीन कोरसिया यांनी त्यांच्यावरती सेंट्रल बँक माध्यमातून दिलेले गृह लोन राहिलेलं नाही असे गवाही दिले व त्यांना पूर्णपणे रक्कम दिली त्यांच्या घराचे पूर्ण दस्तऐवज त्यांच्या सुपूत केले व त्यांच्या दुःखात समाविष्ट झाले.त्यांचं दुःख तर हे आम्ही भरून काढू शकत नाही परंतु त्यांना बँकेच्या माध्यमातून त्यांच्यावरती असलेले जे लोन होते ते पूर्णपणे टाटा एआय च्या इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून निल झालेले आहे . व त्यांना यापुढे बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचा हप्ता किंवा कुठल्याही प्रकारचा लोन त्यांच्यावरती नाही असे निल चे दाखले त्यांनी दिले त्याकरिता मुक्ताईनगर येथील सर्व तमाम जनतेला सेंट्रल बँक मॅनेजर यांनी आव्हान केलेले आहेत. की आपण आपल्या कुठल्याही प्रकारचं लोन हाऊसिंग लोन करत असताना आपण आपले इन्शुरन्स करणे गरजेचे आहे जेणे करून दुर्दैवी कुठलीही घटना घडली तर, त्यावेळेस आपल्या परिवाराला त्याच्यापासून वाचता येते व होणाऱ्या नुकसानास आपण वाचू शकतो. असे सेंट्रल बँक मॅनेजर गोपाल पाटील व सहाय्यक प्रबंधक नितीन कुरेशिया यांनी जनतेला आव्हान केले.



