52 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी च्या तालुकास्तरातून शेख अस्फान शेख अनिस बागवान प्रथम क्रमांक

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव :6/ जाने2024रोजी 52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे तालुकास्तरीय आयोजन ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मालेगाव येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनीमध्ये विविध विषयावर तालुकास्तरातील विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण सादर केले. त्यामधून कार्बन डाय-ऑक्साइड चे वाढते प्रमाण,कार्बन डाय-ऑक्साइडमुळे आरोग्यावर होणारे परिणाम, पृथ्वीचे सुरक्षा रक्षक म्हणून ओळखले जाणाऱ्या ओझोनवायुला कार्बन डाय ऑक्साईड मुळे पडणारे खड्डे, वातावरणातील वाढते प्रदूषण, प्राणवायू समजल्या जाणाऱ्या ऑक्सिजन मध्ये मिश्रित झालेल्या कार्बन डाय-ऑक्साइडमुळे मानवी जीवसृष्टीला श्वास घेताना उद्भवणाऱ्या अनेक समस्या अशा प्रकारच्या विविध समस्येला कारणीभूत व घातक ठरत असलेल्या कार्बन डाय-ऑक्साइड या परिणामकारक वायूला पूर्णपणे नष्ट करून आपल्या मानवीजीव सृष्टीला कार्बनमुक्त जीवन कसे जगता येईल. वातावरणात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड या वायूला कशाप्रकारे नष्ट करता येईल. या गंभीर विषयावर शेख अश्फान शेख अनिस या विद्यार्थ्याने एक चांगले सायन्स प्रोजेक्ट तयार करून अनेकासमोर त्याचे सादरीकरण केले. व आपल्या माहिती द्वारे त्याने अनेकांनचे मन जिंकत.त्याने स्वतः तयार केलेल्या सायन्स प्रोजेक्ट चे महत्व पटवून दिले
त्याचे हे प्रोजेक्ट पर्यावरण पूर्वक. व मानवी जीवसृष्टीच्या हिताचे व भविष्यात कार्बन डाय-ऑक्साइड च्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीमध्ये उद्भवणाऱ्या अनेक विविध प्रकारच्या समस्यांना कशाप्रकारे तोंड देऊन. कशाप्रकारे कार्बन डाय-ऑक्साइड या घातक वायुला नष्ट करता येईल. यांचे एक सुंदर प्रयत्न शेख अशफानने आपल्या सायन्स प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये मांडला. त्याचा या प्रोजेक्टची अनेकांमध्ये चर्चा होत आहे वरिष्ठ मंडळीकडून त्याच्या या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक देण्यात आले आहे
मेडशी येथील ग्रामीण भाग असलेल्या संस्कार विद्या मंदिर शाळेतील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी तालुकास्त्रातून प्रथम आल्याबद्दल. शेख अशफान शेख अनिस बागवान यांचे सगळीकडे शाळा, कुटुंब व नातेवाईका कडून खुप कौतुक व अभिनंदन होत आहे. त्याच्या या यशाचे शौर्य तो आपल्या शिक्षक व आपल्या कुटुंबातील वरिष्ठ यांना देत आहे असे तो सांगतो.



