मलकापूर येथील नळगंगा नदी वीट भट्टी यांच्या विळख्यात

मलकापूर प्रतिनिधी शेख निसार:- मलकापूर शहरातील म्हाडा कॉलनी च्या समोर नळगंगा नदी पात्रामध्येच वीट भट्ट्या वाल्यांनी अतिक्रमण करून नळगंगा नदीचे पात्र कमी करन्यास सुरुवात केली आहे अगोदर या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झालेली आहे त्यानंतर उर्वरित राहिलेल्या पात्रात वीटभट्ट्या धारकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे
मलकापूरचे सर्व वीट भट्ट्या ह्या वैध आहे की अवैध आहे याची तपासणी करताना एकही महसूल विभाग चे अधिकारी तसेच वायू प्रदूषण चे अधिकारी तपासणी करताना दिसले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे तसेच हे विट भट्टया वाल्यांन कडून शासकीय नियमाचा उल्लंघन यांच्याकडून होत आहे तरीपण शासकीय अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई यांच्यावर करून त्यांच्या कर्तव्याचे पालन करीत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे ही पण चर्चा रंगत आहे की तेरी भी चूप मेरी भी चूप तरी वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय अशी चर्चा शहरात रंगत आहे



