Uncategorizedमहाराष्ट्रविदर्भ
खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते तांडा समृद्धी योजनेचे सदस्य पवार यांचा सत्कार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : किन्हिराजा येथील युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार यांची यांनी अकोला लोकसभेचे खासदार अनुप जी धोत्रे यांची भेट घेवून तांडा वस्तीच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली व यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी नवनियुक्त तांडा समृद्धी योजनेच्या समितीवर पवार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला
मालेगांव तालुका तांडा समृद्धी योजनेवर अशासकीय सदस्य पदावर किन्हिराजा येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार यांची निवड करण्यात आली मालेगांव तालुक्यात बंजारा समाज वस्तीचे २२ तांडे असून या तांडा वस्तीची विकास करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांची भेट घेवून पत्रकार भीमराव पवार यांनी अनेक समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली यावर खासदार अनुप धोत्रे यांनी पत्रकार पवार यांचा सत्कार केला व यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून यावेळी त्यांचे सोबत, ह भ प विनोद महाराज, शामराव राठोड,भाजपा युवा मोर्चा मालेगांव तालुकाध्यक्ष पवन इंगळे,शंकर खोपडे सह अनेक नागरिक उपस्थित होते.




