खानदेशजळगावा जिल्हा
कर्जबाजारी शेतकऱ्याने झाले जीव मुक्त

जळगाव, प्रतिनिधी
यंदा निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग नैराश्यात असून जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा येथे घडली असून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील शेतकरी दीपक शिवाजी चौधरी (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २८ नोव्हेंबरला दुपारी उघडकीस आली. दीपक चौधरी आई पानूबाई, पत्नी छाया, रोहित व सत्यम अशी दोन मुलं यांच्यासह झुरखेड्यात वास्तव्याला होते. आपल्या अल्प शेतीवरच कुटूंबीयांचा उदरनिर्वाह ते करीत होते.



