Uncategorized

20 मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाकरिता दिनांक 20 /11/ 2024 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रिया करिता आज

मुक्ताईनगर

20 मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाकरिता दिनांक 20 /11/ 2024 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रिया करिता आज दिनांक 19 /11 /2024 रोजी एस एम कॉलेज क्रीडा संकुल ,मुक्ताईनगर, ता. मुक्ताई नगर ,जिल्हा जळगाव येथून एकुण 322 मतदान केंद्र करिता माननीय निवडणूक निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरूवा यांचे उपस्थितीमध्ये साहित्य वाटप केले .साहित्य वाटप करण्यासाठी एकूण 22 टेबल चे नियोजन करण्यात आलेले होते. सकाळी 8.00 वाजता सूक्ष्मनिरीक्षक श्री ए.के.सिंग डीजीएम ऑर्डर फॅक्टरी वरणगाव यांचे उपस्थितीमध्ये एस एम कॉलेज मुक्ताईनगर येथील स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली. पोलिंग टीम मतदान केंद्रावर एस एम कॉलेज क्रीडा संकुल मुक्ताईनगर येथून सकाळी 10.00 वाजेपासून दुपारी ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत नेमून दिलेल्या मतदान केंद्र ठिकाणी रवाना झालेल्या आहेत . पोलिंग पार्टी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर सुस्थितीत पोहोचल्या आहे की नाही याकरिता एकुण 31 क्षेत्रीय अधिकारी यांचे मार्फत तपासणी करण्यात आलेली आहे .तसेच एस एम कॉलेज मुक्ताईनगर येथे टपाली मतदाना करिता टपाली मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे.
20 मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 महिला संचलित मतदान केंद्र, 5 आदर्श मतदान केंद्र, 1युवा मतदान केंद्र ,2 दिव्यांग मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button