Uncategorized

खामगाव येथे शिवसेना मेळावा संपन्न

..खामगाव.जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी खामगाव-येथे शिवसेना खामगाव मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. या मेळाव्याला महायुतीचे व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विद्यमान आमदार आकाश दादा फुंडकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आव्हान आपल्या भाषणातून केले या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. तसेच याआधी छप्पर बंद मुस्लिम समाजाच्या दीड हजार युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या प्रचारार्थ संपूर्ण तरुणाई मोठ्या जोषाने आणि अभिमानाने काम करत असताना दिसत आहे .त्यांच्या प्रचार फेऱ्यांना सुद्धा उत्साह पूर्ण प्रतिसाद मिळत आहे. खामगाव मतदार संघातील पिंपळगाव राजा, कंझारा लखनवाडा खामगाव या गावातील शपर बंद मुस्लिम समाजाच्या दीड हजार युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये थेट प्रवेश घेतला आहे….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button