20 मुक्ताईनगर सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरळीतपणे पार पाडावी याकरिता प्रशिक्षण.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मुक्ताईनगर प्रतिनिधी
20 मुक्ताईनगर सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरळीतपणे पार पाडावी याकरिता दिनांक 15 /11/24 रोजी एस एम कॉलेज येथे निवडणूक निर्णय अधिकारी मुक्ताईनगर तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण घेण्यात आले. पहिले सत्र सकाळी नऊ ते एक तर दुसरे सत्र दोन ते सहा अशा वेळामध्ये घेण्यात आले. या या प्रशिक्षणासाठी एकूण 689 मतदान अधिकारी उपस्थित होते त्यापैकी गैरहजर असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष 4 आणि मतदान अधिकारी 15 यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल.मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण स्क्रीन द्वारे देण्यात आले .उपस्थित केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक आणि मतदान यंत्र ची जुळवणी सर्व मतदान केंद्र अधिकारी यांच्या कडून करून घेण्यात आले. सोबतच आज टपाली मतदानासाठी 12 कक्ष उपलब्ध करून देण्यात आले. मतदान प्रकियेसाठी असलेल्या कर्मचारी यांनी टपाली मतदान केले. आज एकुण 1108 टपाली मतदान झाले.



