“युवासेनेच्या रिसोड तालुका उपाध्यक्षपदी उद्धव बोरकर यांची नियुक्ती “

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोड : – रिसोड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात सतत पक्षप्रवेश होत आहेत. तसं पाहता रिसोड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार नाही. तरीपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश होत आहे. त्याचप्रमाणे दिनांक २९/१०/२०२४ रोजी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ मापारी, रिसोड विधानसभा संपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख, युवासेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मडके, यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड तालुक्यातील कोयाळी बोरकर येथील उद्धव बोरकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या युवासेनेच्या रिसोड तालुका उपाध्यक्षपदी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेशराव देशमुख यांच्या हस्ते उद्धव बोरकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती केली आहे.त्यांना पुढील कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या पक्षाच्या चौकटीत राहूनच काम करावे असे नियुक्ती पत्र देतांना गणेश देशमुख यांनी म्हटले आहे. यावेळी रिसोड तालुका शिवसेना समन्वयक घनश्याम मापारी, युवासेनेचे तालुकाप्रमुख डॉ. गजानन सानप, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान वाकुडकर, रिसोड विधानसभा युवासेना अधिकारी हेमंत घोडे, सचिन लहाने, अरुण वाघमारे, विजय बोरकर, उत्तम खडसे, शंकर बोरकर, बाळू बोरकर, प्रकाश बोरकर इत्यादी अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते. यांच्या नियुक्तीमुळे रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढत आहे.



