तेल्हारा तालुक्यातील नरसीपुरात झाली चक्क 27 पोल वर असलेल्या विद्युत तारांची चोरी; गुन्हा दाखल! विद्युत तारांची किंमत १ लाखाहून अधिक!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
नरसीपुर , दि. 23 ऑक्टोंबर|
दिवसा ढवळ्या नरसीपुर येथील शेत शिवारात ॲल्युमिनियमचे विद्युत तार चोरी झाल्याची खळबळ जनक घटना नुकतीच घडली आहे. तेल्हारा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भांबेरी वीज वितरण केंद्रांतर्गत ग्राम नरसीपुर शिवारात रशीद खान यांच्या शेतात विद्युत वितरण महावितरण कंपनीने रोहित्र लावलेले आहे. मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी अंदाजे दुपारी एक ते चार वाजे दरम्यान तब्बल 27 पोल वरील एक लाखाहून अधिक किमतीचे असलेले विद्युत तार अज्ञात इसमाने चोरी करून नेले असल्याचे खळबळ जनक घटना घडली. या घटनेची तक्रार महावितरण कंपनीमध्ये भांबेरी येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता अतुल संजय गोखले यांनी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये नोंदविली आहे. सदर अल्युमिनियम विद्युत तारा ह्या अजमत खा मेहबूब खा, अ. अजीज अ. मजीद, अबशीर अ याकूब, अजीज खा. खलील खा., शे. सलीम शे. लाल, अजहर खा अबेर खा, शे. शहीद शे. मेहबूब , युनिस पटेल तमीज पटेल, यांचे शेतातून चोरण्यात आल्याचे फिर्यादी महावितरण कंपनी भांबेरीचे कनिष्ठ अभियंता अतुल गोखले यांनी तक्रारीत नमूद केले आहे . सदर प्रकरणी कार्यवाही व्हावी अशी मागणी सुद्धा या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. तेल्हारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 चे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेचा पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस करीत आहेत.



