महाराष्ट्रसामाजिक

मुक्ताईनगरला संबोधी नगर मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.


मुक्ताईनगर:-(प्रतिनिधी)
मुक्ताईनगरला धम्मचक्र प्रवर्तन दिनी संम्यक संबोधी बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संबोधी बुद्ध विहाराचे नियोजित जागेला संरक्षणासाठी तार कंपाऊंड तयार झालेले असून महिलावर्ग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केला असता सुरुवातीला पंचशील ध्वजाला बौद्ध उपासक व उपासीका यांचे समवेत डिव्हिजनल ऑफिसर समता सैनिक दल अरुण वानखेडे यांनी सलामी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रवींद्र जी मोरे हे होते तर उद्घाटक राज्य संघटक के.वाय .सुरवाडे होते प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूर्तीचे मान्यवरांचे असते पुष्पाने दीपा ने धुपाने पूजन करून वंदन करण्यात आले.
मान्यवरांचा सत्कार करून बुद्ध विहाराचे नियोजित जागेवर समाज बांधवांकडून दानातून भव्य दिव्य बुद्ध विहार लवकरच बांधकामाला सुरुवात करणार असून तार कंपाऊंड पूर्ण केले आहे दरवर्षी या नियोजित जागेवर बौद्ध समाज बांधव महिला मंडळ संबोधी नगर मधील सर्व उपासक उपासिका येथे सामाजिक कार्यक्रम राबवित असतात धम्मचक्र प्रवर्तन दिनी 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली व 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि भारताचे संविधान प्रस्तावना तालुक्यातील हर घर घर पोचविण्याचा संकल्प तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला
आहे प्रा. डॉ. संजीव साळवे साहित्यिक डॉक्टर ऑफ भालेराव जयपाल बोदडे केवाय सुरवाडे पिढी सपकाळे बीडी गवई रवींद्र मोरे अरुण वानखेडे यांची शेजवडे मोहन मेढे रवींद्र झनके यांनी मनोगत व्यक्त केले तर जनार्दन बोदडे विक्रम धुंदले दीपक इंगळे लखन पानपाटील त्यांचा युवा अध्यक्ष कैलास अडायंगे सुनील सावळे दिनेश बगाडे प्रवीण झणके भीमराव इंगळे जगदेव इंगळे आशिष शेजवडे चेतन धनके नितेश सावळे राहुल सावळे विशाल झनके युवराज शेजोळे सिताराम सावळे रवींद्र तायडे सचिन मेढे आकाश सावळे रवींद्र वाघमारे महिला आघाडीच्या आरतीताई गवयी उषाताई वाघ पुष्पाताई सपकाळे प्रतिभाताई गवयी वच्छलाबाई तायडे कल्पना सावळे सुनंदा मेढे वैजन्ताबाई वाघमारे रेखाबाई सावळे सुनीता झनके पंचफुला वाघमारे अलका झनके येडाबाई तायडे दिपाली तायडे प्रमिला तायडे आदी उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सम्यक संबोधी बुद्धी स्ट चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. कुणाल गवयी यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button