मुक्ताईनगरशेती

प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत पिकविमा धारक शेतकऱ्यांना मिळणार एकूण रु.३२७ कोटी लाभ – केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२३-२४” मधील फळ पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की ऑक्टोबर ते मार्च कालावधीमध्ये जळगांव जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळात सलग ५ दिवस तापमान ४५ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने; केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असुन सदर शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे.

तसेच या पूर्वी जानेवारी महिन्यात सलग ३ दिवस कमी तापमानामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली असून, असे कमी व जास्त तापमान मुळे झालेल्या एकूण नुकसान भरपाईची रु.३२७,५५,१५,१८४/- एवढी एकत्रित रक्कम लाभ काही दिवसात जळगांव जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.

कमी व जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र जळगांव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.

भुसावळ : कुऱ्हे प्र.नशिराबाद, पिंपळगाव खु., वरणगाव.
बोदवड : बोदवड, करंजी, नाडगांव.
चोपडा : अडावद, चहार्डी, चोपडा, धानोरा प्र.अडावद, गोरगावले बु., हातेड बु., लासूर.
जामनेर : जामनेर, मालदाभाडी, नेरी बु., पहूर, फत्तेपूर, शेंदुर्णी, तोंडापूर, वाकळी
मुक्ताईनगर : अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे, मुक्ताईनगर.
रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदे प्र.यावल,, निंभोरा बू., रावेर, सावदा.
यावल : भालोद, बामणोद, फैजपूर, किनगाव बू., साकाळी, यावल.

अमळनेर : अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, पातोंडा, शिरुड, वावडे.
भडगाव : आमडदे, भडगाव, कजगांव, कोळगांव.
चाळीसगाव : बहाळ, चाळीसगाव, हातळे, खडकी बु., मेहुणबारे, शिरसगांव, तळेगांव.
धरणगाव : चांदसर बु., धरणगाव, पाळधी बु., पिंप्री खु., साळवे, सोनवद बु.
एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगणगांव, उत्राण गुजर हद्द
जळगाव : असोदा, भोकर, जळगाव, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा.
पाचोरा : गाळण बु., कुऱ्हाड खु., नगरदेवळे बु., नांद्रा, पाचोरा, पिंपळगांव बु., वरखेडी बु.
पारोळा : बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळवे बु., तामसवाडी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button