मेडशी येथील ऐतिहासिक व पौराणिक रेणुका माता मंदिर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – रेणुका देवीला”साऱ्या जगाची आई” अर्थात “जगदंबा” मानतात.रेणुका माता ही क्षत्रिय,ब्राह्मण,आदिवासी व पतीतांची माता व रक्षक असून
रेणुका ही इक्ष्वाकु वंशातील रेणु नावाच्या महाराजाची कन्या,आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ माहुरची रेणुका देवी आहे.आणि ह्याच देवीच मंदीर मेडशी येथे असून हे जवळपास 150 वर्षा पेक्षा जास्त जून मंदिर आणि देवीची मूर्तीची स्थापना आहे.बापूराव खंडेराव घुगे ह्यांनी या मंदिराची स्थापना व बांधणी केली होती.रेणुका मातेच्या तांदळ्याची का पूजा केली जाते.याबाबत अनेक पुराण कथा आहेत.त्यापैकी एका पौराणिक दाखल्यानुसार माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला.तिचे नाव रेणू ठेवण्यात आले.शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले.सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती.अश्या खूप साऱ्या रेणूका देवीच्या अख्यायिका आहेत.मेडशी येथील रेणूका देवी सुद्धा नवसाला पावणारी आणि जागृत असे ऐतिहासिक देवस्थान मागील दोन वर्ष अगोदर गावातील भक्ताकडून देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करून नवीन मंदीर बांधले. नवरात्र मध्ये येथे गावातील तसेच तालुक्यातील भक्ताची मांदियाळी असते.तसेच येथे नऊही दिवस आरती व अष्टमी ला होम व महाप्रसाद असतो.आता ह्या कूलदैवत असलेल्या रेणूका देवीच्या मंदिराच कामकाज श्रीराम बापूराव घुगे व त्यांचे कुटुंब हे पाहतात.तसेच गावातील गोविंदराव घुगे,उल्हास मेडशीकर,उत्तम देशमुख,गजानन पिंपळकर,भास्कर थोरात,धीरज विश्वकर्मा,महेश धाबे,निखिल श्रीवास्तव,अजिंक्य मेडशीकर सह गावातील भक्त रेणूका देवीची वर्षभर मनोभावे पुजा अर्चना करतात.



