महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ने वृक्षारोपण करुन केला “जागतिक फार्मसीस्ट डे” साजरा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे तेल्हारा ता प्रतिनिधी

तेल्हारा दि. २९ सप्टेंबर | तेल्हारा शहरामधील हॉटेल रसोई घोडेगाव रोड तेल्हारा येथे बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता तेल्हारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने वृक्षारोपण करुन जागतिक फार्मसीस्ट डे साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम श्री.गजानन महाराजांच्या प्रतमेला वंदना करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. तदनंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर उपस्थित मान्यवरांचे महत्वपूर्ण भाषण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला . याप्रसंगी अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वतीने सभासदांना एप्रोन प्राप्त झाले होते त्या एप्रोन चे मान्यवरांच्या हस्ते सर्वांना वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दीपकजी राठी मलकापूर यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. यावेळी कार्यक्रमाला सर्व तेल्हारा तालुक्यातील व तेल्हारा शहरातील सर्व महिला-पुरुष केमिस्ट सभासद उपस्थित होते . याप्रसंगी उत्तम स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन योगीराज फार्मा तेल्हारा यांचे कडून करण्यात आले तसेच कार्यक्रमाची सांगता उत्कृष्ट आभार प्रदर्शनाने करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button