खानदेशजळगावा जिल्हा

खडसे महाविद्यालयातील रासेयो एककामार्फत स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न..मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर


राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केंद्र शासन व क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव रा.से.यो. विभाग यांच्या निर्देशानुसार “स्वच्छता ही सेवा” (SHS) मोहिमे अंतर्गत आज दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांना स्वयम् स्वच्छता व परिसर स्वच्छतेचे महत्व विशद केले. महाविद्यालयाच्या परिसराची साफसफाई करून त्यानंतर तहसील कार्यालय मुक्ताईनगर पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परिसराची साफसफाई करण्यात आली व तेथील प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट नगरपालिकेच्या घंटागाडीमार्फत लावण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजय साळवे, क्रीडा संचालिका डॉ. प्रतिभा ढाके यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून बाह्य स्वच्छते सोबत आंतरिक स्वच्छतेचे महत्व स्पष्ट केले. स्वच्छता अभियानांतर्गत तहसील कार्यालय मुक्ताईनगर परिसरातील सुमारे ३५
किलो प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात महाविद्यालयातील २१० रासेयो स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक बावस्कर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.कृष्णा गायकवाड व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ताहिरा मीर यांनी अथक परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button